marathiyodha

Relationship


मराठी

हा एक शब्दच आपल्याला सर्व काही सांगून जातो, नाही का?
मराठी कोणाची मात्रु भाषा असेल, कोणी फक्त बोलू शकत असेल, कोणी फक्त समजू शकत असेल,
तेवढे ही आपल्याला पुरेसे नाही का आपली मन जोड़ण्यासाठी ?
तेच करण्याचा आपल्या सारख्या एका मराठी माणसाचा एक छोटासा प्रयत्न !
आम्ही पण आपल्यातलेच एक मराठी ! एवढीच आमची ओळख !

दिशा
कुठे चाललाय माणुस, का इतका बदललाय
पुढे जाता जाता बालपणीच्या सवंगड़यालाच विसरलाय
कधी विचार केलात असे का घडतय? सर्व सूखे असुनही जीवन का कुढतय ?
उत्तर शोधण्याचा प्रयत्न माणुस नेहमी बाहेरच करत असतो
उत्तर सापडणार नाही हे त्यालाही माहिती नसतं
मग, तरीही का..तरीही का स्वतःला एवढं पुढे न्यायचं
की छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणी मोठ्या सुखाच्या अनुपस्थितिने दुखी व्हायचं ?
कुठे नेणार आपल्याला हे आपले विचार आणि ही विचारसरणी
फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या चिमुकल्या साथीदारांना...
आपल्यालाच कळत नाही आपण कुठे जातोय तर त्यांना कसा मार्ग दाखवणार ?
चला आपण एक छोटासा प्रयत्न करू, आपण स्वतःशीच प्रामाणिक राहू
आणि एकमेकांना जोडून आपलेसे करू !
आपल्या सारख्या वाचकांचा असाच आमच्यावर आर्शीवाद असू द्या ! तेच आम्हाला हवे आहे !
जर आपणास आमची वेब साईट आवडली असेल तर आपली प्रतिक्रिया नक्की कळवा !


If you have questions, contact us .